भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


भुसावळ (21 जून 2026) : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रविवार, 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कृष्णचंद्र हॉलजवळील मोकळ्या मैदानात सकाळी 6 ते 7 या वेळेत आयोजित योग सत्रात संस्थेच्या 50 हून अधिक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

योगाबाबत मार्गदर्शन
प्रसंगी प्रसिद्ध योग प्रशिक्षिका योगमास्टर पूनम कुलकर्णी यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विषद केले. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यान यांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.




सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले व आभार मानताना त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे छोटू गवळी, स्वाती भोळे, पंकज कुलकर्णी यांच्यासह सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

यावेळी डॉ. चारुलता पाटील, स्वाती फालक, गणसिंग पाटील, प्रवीण वारके आदी सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

उपस्थितांनी योगमास्टर पूनम कुलकर्णी यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !