भुसावळ जंक्शनवरील उत्तर दिशेतील पादचारी पूल इतिहास जमा : नवीन पुलाची होतेय उभारणी


Northern footbridge at Bhusawal Junction becomes history; new bridge under construction भुसावळ (23 जून 2026) : भुसावळ रेल्वे स्थानकावरील उत्तर दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचा (एफओबी) प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 जवळील भाग विघटनाच्या कामासाठी मंगळवार, 23 जूनपासून सुमारे चार महिने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा जुना पूल हटकून त्या जागी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा नवीन पादचारी पूल उभारण्यात येत आहे. ऐनवेळी प्रवाशांची धावपळ आणि गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून प्रवाशांना नवीन पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवाशांसाठी नवीन पुलाची उभारणी
भुसावळ स्थानकावरील जुने झालेले पादचारी पूल बदलून त्या ठिकाणी अधिक सुरक्षित आणि रुंद पूल उभारण्याचे काम गेल्या काही दिसांपासून टप्या-टप्याने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर दिशेकडील जुन्या पुलाची जीर्ण झालेली संरचना पूर्णपणे हटवली जाणार आहे. भविष्यात या ठिकाणी प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि गर्दीविरहित उत्तम प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे. हे विघटन कार्य अत्यंत हायटेक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले जाईल, जेणेकरून धावत्या गाडयांना किंवा पॉटफॉर्मवरील प्रवाशांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !