प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळ-दादर खान्देश एक्स्प्रेस आठवडाभर नियमित धावणार !


Saval-Dadar Khandesh Express to run regularly throughout the week! भुसावळ (25 जून 2026) : खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. भुसावळ-दादर व दादर-भुसावळ एक्स्प्रेस आता आठवड्यातील शुक्रवार वगळता सहा दिवस नियमित धावणार आहे. या निर्णयामुळे गाडीचा स्पेशल ट्रेनचा दर्जा काढला जाणार असल्याने या गाडीचे भाडेदेखील कमी होण्याची आशा आहे.

खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मागणीला यश आले आहे शिवाय धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही या मागणीसाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे.



महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत स्पेशल ट्रेन म्हणून चालवल्या जाणार्‍या गाड्यांवर प्रवाशांना अतिरिक्त 25 ते 30 टक्के भाडे भरावे लागत होते. मात्र गाडी नियमित स्वरूपात सुरू झाल्यानंतर हे अतिरिक्त भाडे लागू राहणार नसल्याने प्रवाशांच्या खर्चातही बचत होणार आहे.

याशिवाय रेल्वे प्रशासनाने बोईसर आणि दहाणू रोड या स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा आणि परिसरातील प्रवाशांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

या निर्णयामुळे खानदेशातील प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी होणार असल्याने प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !