आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! पंढरपूरसाठी चार विशेष रेल्वेगाड्या : भुसावळ स्थानकावरूनही सुटणार विशेष गाडी

नागपूर, नवी अमरावती, खामगाव आणि भुसावळ येथून विशेष गाड्यांचे नियोजन


भुसावळ (25 जून 2026) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणार्‍या लाखो भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर आणि भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर एकूण 16 विशेष फेर्‍या चालविण्यात येणार असून, विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

नागपूर-मिरज विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01205 : 23 व 24 जुलै 2026 रोजी नागपूरहून सकाळी 8.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01206 : 24 व 25 जुलै 2026 रोजी मिरजहून 12.55 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 12.25 वाजता नागपूर येथे पोहोचेल.



या स्थानकावर थांबे
या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसबा डोंगरगाव, जत रोड, ढाळगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

नवी अमरावती-पंढरपूर विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01119 : 21 व 24 जुलै 2026 रोजी नवी अमरावतीहून दुपारी 2.40 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. 01120 : 22 व 25 जुलै 2026 रोजी पंढरपूरहून 7.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 12.50 वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल.

या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

खामगाव-पंढरपूर विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01121 : 21 व 23 जुलै 2026 रोजी खामगावहून 11.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. 01122 : 22 व 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरहून 5.00 वाजता सुटून त्याच दिवशी 7.30 वाजता खामगाव येथे पोहोचेल.

या गाडीला जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला.

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01159 : 24 व 25 जुलै 2026 रोजी भुसावळहून 1.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. 01160 : 25 व 26 जुलै 2026 रोजी पंढरपूरहून 10.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 1.00 वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना
नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या विशेष गाड्यांमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन असतील.
भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीत 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन असतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !