भुसावळचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची गट-अ संवर्गात पदोन्नती ; पालिकेत अधिकार्‍यांनी केला सत्कार


भुसावळ (26 जून 2026) : भुसावळ नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांची गट-ब संवर्गातून गट-अ संवर्गात पदोन्नती झाल्याबद्दल नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, कार्यालय अधीक्षक अजित भट, प्रशासकीय अधिकारी दीपक अहिरे, संकीर्ण प्रमुख वैभव पवार, रचना सहाय्यक अंकुश गोसावी तसेच अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उल्लेखनीय कामाचा केला गौरव
उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुख्याधिकारी धांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांच्या भावी प्रशासकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत पदोन्नतीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !