भुसावळचे शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांची टीईटी पेपरफुटीनंतर टीका : म्हणाले ; प्रकटन शब्दही शुद्ध लिहू न शकणारी परीक्षा परिषद म्हणे शिक्षकांची पात्रता तपासणार !


भुसावळ (27 जनू 2026) : रविवार, 28 जून रोजी राज्यात सर्वत्र होणारी टीईटी परीक्षा शनिवार, 27 जून रोजी पेपर फुटल्यामुळे रद्द करण्यात आली. या संदर्भातील जाहीर प्रकटन शनिवारी आयुक्त, म. राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे मात्र त्यात प्रकटन हा शब्द प्रगटन असा लिहून मराठी शुद्ध लेखनाबाबतचे आपले अगाध ज्ञान जाहीर करण्यात आल्यानंतर त्यावर भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी टीकेची झोड उठवली आहे.

काय म्हणाले प्र.ह.दलाल ?
प्रसिद्धी माध्यमांना दलाल सरांनी कळवलेल्या माहितीनुसार, खरं तर
प्रश्न फक्त ह्या एका पत्रकाचा नाही तर शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी-बारावी शालांत परीक्षा, अधिकृत पाठ्यपुस्तके यासह शिक्षकांना प्रशिक्षणाचे वेळी दिल्या जाणार्‍या पुस्तिका यातही मराठीसुद्ध लेखनाच्या अनेक गंभीर चुका नेहमी व नियमितपणे होतात त्यामुळे परीक्षा परिषदेला व तेथील तथाकथिन तज्ज्ञ मंडळींना जाहीर त्रिवार वंदन! विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण विकासालाही सलाम ! अशी उपरोधिक टीका येथील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !