हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rainfall in the Hatnur catchment area : Alert issued for riverside villages भुसावळ (28 जून 2026) : हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्याची आवक वाढल्यानेहतनूर धरणातून पुढील काही तासांत विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


