भुसावळात कोळी समाज विकास मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव


भुसावळ (28 जून 2026) :  भुसावळ कोळी समाज विकास मंडळ, भुसावळ यांच्या वतीने रविवार, 28 रोजी दहावी, बारावी, पदवी तसेच विविध शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील तब्बल 146 गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी कैलास सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ तायडे, दिलीप सूर्यवंशी, प्रभाकर सोनवणे, आदित्य सोनवणे, आकाश सोनवणे, शुभम सोनवणे, लोकेश सपकाळे, रोहन सोनवणे, रविंद्र बाविस्कर, सविता सोनवणे, संगीता सोनवणे, विजय सपकाळे, पन्नालाल सोनवणे आणि ऋषिकेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी रोहन सोनवणे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरून उच्च ध्येय ठेवावे, तसेच यश संपादनासाठी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे तसेच चंद्रकांत सूर्यवंशी, दीपक सोनवणे, दत्तात्रय सपकाळे, शांताराम सपकाळे, वसंत सपकाळे, महारु कोळी, विजय तावडे, संदीप कोळी, गोकुळ सपकाळे, नारायण कोळी, भागवत सपकाळे, उत्तम कोळी, आनंदा दोडे, अशोक सोनवणे, दिप्तेश सोनवणे आणि शशिकांत सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर दीपक सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !