यावल शहरात उद्या पेहरन ए-शरीफ उत्सव
खिर्णीपुरा येथुन होणार मिरवणुकीला सुरवात
यावल (29 जून 2026) : यावल शहरात शहरात मंगळवार, 30 रोजी ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाला सुमारे 100 हुन अधिक वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा करतात. त्यात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे (पवित्र वस्त्र) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात.
खिर्णीपुरा उत्सव समितीतर्फे आयोजन
यंदाच्या उत्सवाचे आयोजन खिर्णीपुरा उत्सव समितीने केले आहे. तसेच बुधवारी पेेहरण निमित्ताने कुश्त्यांची दंगल देखील आयोजित करण्यात आली आहे.


बगदाद येथून आणले पवित्र वस्त
यावल शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत ( नाते पाक ) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.
मंगळवार, 30 जुन रोजी यावल शहरात पेहरन शरीफ साजरा केला जात आहे. शहरातील डांगपुरा येथून सायंकाळी मिरवणुकीला सुरवात होईल. या उत्सवात हिंदू-मुस्लिम सह सर्व धर्मिय बांधव यात सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची धारणा आहे. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक येतात. तेव्हा सांयकाळी साजर्या होणार्या या पेहरन शरीफच्या यशस्वीते करीता उत्सव समिती अध्यक्ष शफीउल्ला खान, उपाध्यक्ष सैय्यद शकील सैय्यद हमीद, खजिनदार इम्रान खान सईद खान सह सदस्यांच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे तर पेहरन शरीफ मिरवणुकी करीता पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
बुधवारी रंगणार कुस्त्यांच्या दंगली
पेहरण ए शरीफ निमित्ताने बुधवारी आयेशा नगरात हाजी हकीम हॉलच्या समोर दुपारी दोन वाजेपासुन कुस्त्यांची दंगल होणार आहे. या दंगल ए आममध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह जम्मू-काश्मिर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशातून नामवंत मल्ल अर्थात पहेलवान येथे सहभागी होती. दंगल ए आम च्या यशस्वीते करीता दंगल समितीचे अध्यक्ष शेख मजरोद्यीन, उपाध्यक्ष समीर खान, खजिनदार कलीमोद्यीन शेख, इकबाल पहेलवान आदी परिश्रम घेत आहे.
