भुसावळातील संजीवनी ब्लड ग्रुपला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान 2026’ पुरस्कार


भुसावळ (30 जून 2026) : सामाजिक क्षेत्रात रक्तदान व रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणार्‍या संजीवनी ब्लड ग्रुप, भुसावळ यांना मुंबई (मालाड) येथे अरिहंताणं रक्तसार्थी संस्था, राजस्थान यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान 2026’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले.

गरजूंना वेळेवर रक्ताची उपलब्धता
हा सन्मान संजीवनी ब्लड ग्रुपच्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ रुग्णसेवा व रक्तदान कार्याची पावती आहे. आजपर्यंत हजारो रक्तदात्यांना एकत्र आणून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य गृपमार्फत सातत्याने केले जात आहे. या यशाबद्दल सर्व रक्तदाते, हितचिंतक आणि सहकार्‍यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. हा सन्मान भारतीय सेनेतील कर्नल डॉ.सुरेश सेनी (हरियाणा) यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अरिहंत रक्तसार्थी संस्थेचे संस्थापक कैलाश जैन उपस्थित होते.



रक्तदात्यांना पुरस्कार समर्पित
रक्तसेवेसाठी दिवस-रात्र योगदान देणार्‍या प्रत्येक रक्तदात्याला हा पुरस्कार समर्पित आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा गौरव शक्य झाला असून हा पुरस्कार संपूर्ण संजीवनी ब्लड ग्रुप परिवाराचा आहे. पुरस्काराने समाजसेवा आणि रक्तदानाच्या कार्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे संजीवनी ब्लड ग्रुपचे सागर विसपुते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !