लोकांच्या उदार दायित्वातुन चालतय यावलचे वृध्दाश्रम : 14 वृध्दांना दिली जातेय सेवा

कुटुंबासारखे वातावरण : वाढदिवसदेखील होतात साजरे


यावल (2 जुलै 2026) : शहरातील बालाजी सिटीमध्ये लोकांच्या उदारदायित्वातून यशोदायी वृध्दाश्रम चालवले जात आहे. दानशूर व्यक्तीमत्वांच्या माध्यमातुन मिळणारे अन्नदानासह भेट वस्तू, अन्न धान्यातून या वृध्दाश्रमात 14 वृध्दांना सेवा दिली जाते. विशेष म्हणजे या वृध्दाश्रमातील वृध्दांना कुटुंबासारखी वागणूक देत त्यांचे वाढदिवस देखील साजरे करून समाजापुढे हा वृध्दाश्रम एक आदर्श ठरत आहे.

14 वृद्धांना मिळतेय सेवा
यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या बालाजी सिटीमध्ये यशोदाआई वृध्दाश्रम आहे. या वृध्दाश्रम संस्थेचे अध्यक्ष पंकज बारी, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव विजय सावकारे यांच्या मध्यमातून येथे 14 वृध्दांना सेवा दिली जात आहे. या वृध्दाश्रमातील वृध्दांच्या सर्व गरजा भागवतांना समाजातीलच दानशूर व्यक्तीमत्वाची मदत होत आहे. अनेक जण आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस तसेच कुटुंबातील कुणी मयत झाल्यास त्यांचे उत्तर कार्य, वास्तुशांती सारख्या कार्यक्रमातील वायफळ खर्च टाळून या वृध्दाश्रमात करत असलेल्या मदतीतून येथे सेवा देण्यात येत आहे. येथे वास्तव्यास वृध्दांना सेवा देत असतांना त्यांना कुटुंबासारखी वागणून देखील दिली जाते. यात वृध्दाचे वाढदिवस देखील केक आणुन साजरे केले जातात. त्यांच्या सुख दुखात संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या सोबत उभे राहून त्यांना बळ देतांना येथे दिसतात.



वाढदिवस साजरा
वृध्दाश्रमातील काशीनाथ सोनवणे यांचा 89 वा वाढदिवस आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमातील सर्व सभासद व सेवकांनी त्यांना केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

वीज कंपनी कर्मचारीकडून मदत
शहरातील रहिवासी तथा विद्युत वितरण कंम्पनीचे कर्मचारी सागर पाठक यांनी देखील नुकताच झालेल्या आपल्या वाढदिवसावर वायफळ खर्च न करता त्यांनी याच वृध्दाश्रमातील जेष्ठांसोबत आपला वाढदिवस साजरा केला व येथे अन्नदानासह विविध साहित्य भेट दिले आणी समाजापुढे आदर्श ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !