हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची नियमित सेवा


भुसावळ (7 जुलै 2026) : मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणार्‍या दोन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची नियमित सेवा सुरू करण्यात आली आहे.

असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 17667 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 8 जुलैपासून तर गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 9 जुलैपासून तसेच गाडी क्रमांक 17665 हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 13 जुलै तर गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 14 जुलैपासून धावणार आहे.

नियमित फेर्‍यांचा तपशील असा
गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजुर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी 4.35 वाजता सुटेल आणि हजुर साहिब नांदेड येथे दुसर्‍या दिवशी09.10 वाजता पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक 17665 हजुर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस हजुर साहिब नांदेड येथून दर सोमवारी 9.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 1.40 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा स्थानकावर थांबा असेल.

गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजुर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी 4.55 वाजता सुटेल आणि हजुर साहिब नांदेड येथे दुसर्‍या दिवशी 9.10 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17667 हजुर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस हजुर साहिब नांदेड येथून दर बुधवारी 9.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी एक वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा स्थानकावर थांबा असेल.

दोन्ही गाड्यांना एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन, एक द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !