भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे अपात्र प्रकरण : 28 जुलैला होणार खंडपीठात सुनावणी
Bhusawal Municipal Council President Gayatri Bhangale disqualification case: Hearing to be held at the Bench on July 28 भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : जात प्रमाणपत्र प्रकरणी भुसावळातील लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे-गौर यांना शासनाने अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात भंगाळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती व या याचिकेवर मंगळवार, 14 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने जनतेचे लक्ष लागून होते. न्या.किशोर संत व न्या.अजित कडेठाणकर यांच्या द्वै सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी आता 28 जुलै रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.
संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेश
सुनावणीदरम्यान नगराध्यक्ष गायत्री भंगाळे गौर यांच्या वतीने अॅड.संजीव देशपांडे यांनी तर याचिकाकर्ते राहुल तायडे यांच्या वतीने अॅड.महेश देशमुख व अॅड.वसंत भोलाणकर यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे प्राथमिक म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रकरणातील संबंधितांना पुन्हा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. अधिक सविस्तर सुनावणीसाठी मंगळवार, 28 जुलै ही पुढील तारीख निश्चित करण्यात आली.

सुनावकडे लागले शहरवासीयांचे लक्ष
मंगळवार, 14 जुलै रोजी सुनावणी होवून निकाल येण्याची शक्यता असल्याने भुसावळकरांचे आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने आता पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
16 रोजीच्या सभेकडे लागले लक्ष
भुसावळातील भाजपा सत्ताधार्यांच्या काळातील पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवार, 16 रोजी पालिका सभागृहात होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर 300 वर विषय आहेत. या सभेतील राजकीय घडामोडींकडे शहराचे आता लक्ष लागले आहे.
