शेतकरी शिवसेना भडगाव तालुकाध्यक्षपदी सोमनाथ पाटील


भडगाव (बुधवार, 15 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील आदर्श शेतकरी सोमनाथ भालचंद्र पाटील यांची शेतकरी शिवसेना भडगाव तालुका प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राज्याचे शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली

शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील रंगराव पाटील (पाचोरा) यांची नियुक्ती पत्रावर सही आहे. हे नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा सोमनाथ पाटील यांच्याकडुन आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !