फैजपूर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे विनोद चौधरी


फैजपूर (गुरुवार, 16 जुलै 2026) : पालिकेच्या उपनगराध्यक्षा निकिता कोळी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर भाजपचे विनोद चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. विरोधकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. बुधवारी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

यांची होती उपस्थिती
मुख्याधिकारी भूषण वर्मा, नायब तहसीलदार जगदीश गुरव, पालिका अधीक्षक हेमंत ठाकरे उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे एकमेव अर्ज असल्याने विनोद चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेला भाजपचे 15 नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम अपक्ष नगरसेवक नगरसेविका गैरहजर होत्या. दरम्यान, या पदासाठी भाजपतर्फे अनेक जण इच्छूक होते. भाजपने समन्वय साधून सर्वांच्या संमतीने विनोद चौधरी यांची बिनविरोध निवड केली. चौधरी हे पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंचवार्षिक काळातील पहिले उपनगराध्यक्ष पद द्यावे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांच्याकडे केली होती. त्यावेळी निकिता कोळी यांचे नाव निश्चित झाले होते.

दरम्यान, पक्षात ठरल्यानुसार कोळी यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर तेथे बुधवारी विनोद चौधरी यांना भाजपने संधी दिली. नगराध्यक्षा दामिनी सराफ, भाजपचे गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. सभेकडे विरोधकांनी पाठ फिरवली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !