भुसावळ पालिकेची आज सर्वसाधारण सभा
विरोधकांचा सभा बेकायदेशीर असल्याचा दावा : भाजपाकडून उपस्थितीचे आवाहन
भुसावळ (गुरुवार, 16 जुलै 2026) : भाजपा सत्ताकाळातील प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांचया उपस्थितीत गुरुवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर शहर विकासाचे तब्बल 300 विषय आहेत. तत्कालीन नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र झाल्यानंतर उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे सूत्रे आल्यानंतर प्रथमच पालिकेत सभा होत आहे.
प्रभारी नगराध्यक्षांचे आवाहन
दुसरीकडे प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी मतभेद विसरुन विरोधकांनी सभेला यावे व काही हरकती असल्यास लेखी स्वरूपात त्यात मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.


विरोधकांचा मात्र सभा बेकायदेशीर असल्याचा दावा
ही सभा बेकायदेशीर असल्याचे निवेदन विरोधकांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. विरोधकांच्या भूमिकेमुळे ते सभागृहात उपस्थिती देणार नाही हे स्पष्ट आहे तर भाजपाकडे संख्याबळ बहुमतात असल्याने सर्व विषयांना मंजुरी मिळेल, असे एकूणच चित्र आहे.
राष्ट्रवादीचा सभा बेकायदेशीर असल्याचा दावा
विरोधी गटाच्या अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जात प्रमाणपत्र अपात्रतेबाबत खंडपीठात याचिका दाखल आहे. हे प्रकरण यायप्रविष्ट आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये तसेच उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे व इतर नगरसेविकांनी उपस्थित केलेल्या तक्रारीनंतर तहकूब केलेले विषय या सभेत नियमबाह्यपणे घेण्यात आले आहेत त्यामुळे ही सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याने रद्द करावी. निवेदन देताना राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे, सचिन पाटील यांच्यासह नगरसेकवक उपस्थित होते.