यावल पालिका हद्दीत कामे करण्यास सा.बां.विभागाला एनओसी नाहीच : पालिकेच्या सभेत 149 विषयांना मंजुरी

अतिक्रमणातील घरकुले होणार नियमाकुल ; कचर्‍याची उचल होत नसल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यावर चर्चा


Public Works Department lacks NOC for carrying out works within Yaval Municipal limits; 149 agenda items approved at municipal meeting. यावल (शुक्रवार, 17 जुलै 2026) : यावल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 16 रोजी दुपारी 12 वाजता वातावरणात झाली. सभेच्या अजेंड्यावर 150 विषय होते. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात केल्या जाणार्‍या विकासकामांना सत्ताधारी गटाने विरोध करीत ना हरकत प्रमाणपत्र नाकारले तर उर्वरित सर्व 149 विषय हे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील, उपनगराध्यक्षा सईदाबी मो.याकूब, मुख्याधिकारी निशिकांत गवई उपस्थित होते.

अतिक्रमण होणार नियमाकुल
पालिका सभेत शहरातील अतिक्रमण नियमाकुल करणे कामी सर्वेक्षण करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याची चर्चा आणि आर.आर.आर सेंटर उभारण्याचा निर्णय असलेले विषय मंजूर करण्यात आले. विरोधी गटाने खुर्च्या खरेदी प्रकरणावरून गदारोळै केला.

यावल नगरपरिषदेमध्ये गुरुवारी तब्बल 150 विषय असलेली जम्बो सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सईदाबी मो.याकूब, मुख्याधिकारी निशिकांत गवई उपस्थित होते. दरम्यान या सर्वसाधारण सभेत प्रारंभी विरोधी गटाकडून खुर्च्या खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला व या विषयावर काही काळ नगरपालिकेत गदारोळ झाला व या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी झाली. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मक्ता देण्यात आलेल्या एजन्सीकडून कचरा उचल होत नाहीये, तेव्हा या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र तक्रार गेल्यानंतर संबंधित मक्तेदाराला काळ्या यादी टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली व जोपर्यंत त्याच्याकडून सक्षम काम होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याच प्रकारचा मोबदला देऊ नये हा विषय मंजूर करण्यात आला.

सा.बां.विभागात नाहरकत देण्यास हरकत
सार्वजनिक बांधकाम विभागास नगरपालिका हद्दीत काम करण्यासाठी नाहरकत देण्याबाबतच्या विषयावर मात्र सत्ताधारी गटाने विरोध दर्शवला तर विरोधी गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करण्याची अनुमती मिळावी याबाबत आग्रह धरला मात्र मतदानाने या विषयाला नामंजूर करण्यात आले. उर्वरित विषय हे रस्ता काँक्रिटीकरण करणे, गटार बांधकाम करणे असे विकास कामांचे होते त्या सर्व विषयांना सत्ताधारी व विरोधी गटाने एकमताने मंजूर केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !