जळगाव-नेरीदरम्यान भीषण अपघात : नादुरुस्त ट्रकवर कार आदळून दोघे ठार
यावल (शुक्रवार, 17 जुलै 2026) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर भरधाव कार आदळून झालेल्या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ गुरुवारी सायंकाळी घडला.
मृतांमध्ये कार चालक इस्राईल शेख इरफान शेख (21, पिंपळदरी, ता.सिल्लोड) व पंकज हरीष बेंडवाल (34, रा.इंदूर) या दोन तरुणांचा समावेश आहे. या अपघातात प्रदीप उर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी (35), गिरीश योगेश चव्हाण (22, दोन्ही रा.खेडी), गौरव राजू परदेशी (रा.इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (रा. खेडी) हे जखमे असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.


‘वन मिस्टेक गेम ओव्हर’
सूत्रांच्या माहितीनुसार, गाडेगाव घाटातील वळणावर नादुरुस्त ट्रक (जी.जे.04 ए.एक्स.2280) हा रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव कार (एम.एच.19 ई.पी.9066) या ट्रकवर आदळली. या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. ज्या ट्रकमुळे अपघात झाला त्या ट्रकवर ‘वन मिस्टेक गेम ओव्हर’ हा संदेश लिहिलेला आढळल्याने घटनास्थळी उपस्थितांमध्ये ही बाब चर्चेची ठरली.
सिल्लोड जाताना अपघात
खेडी (ता.जळगाव) येथील परदेशी कुटुंबातील प्रदीप, अनुज आणि गौरव हे तिघे चुलत भाऊ आहेत. ते कंस्ट्रक्शन व्यवसायात आहेत. गिरीष चव्हाण हा त्यांच्यासोबत काम करतो तर इस्त्रायल शेख हा त्यांच्या गाडीवर चालक होता शिवाय इंदूरचा पंकज बेहवाल हा या भावंडांचा मित्र होता. गुरुवारी सायंकाळी हे सर्वजण कामाच्या निमित्ताने जळगावहून कारने सिल्लोडकडे निघाले असताना गाडेगाव घाटात वळणावर गुजरात्त पासिंगच नादुरुस्त ट्रकवर काद आदळली.
मुलाला पाहताच वडीलांचा आक्रोश
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे राहणार्या शेख कुटुंबातील इस्त्रायल हा सर्वात मोठा भाऊ होता. त्याच्या पश्चात दोन लहान भावंड व आई-वडील आहेत. शेख कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच ते रात्री 10 वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. इस्त्रायल गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. रात्री मालकांसोबत अमळनेर येथून पुढे नाशिक जायचे असल्याचा निरोप त्याने वडीलांना दिला होता. मुलाचा मृतदेह पाहताच वडिलांनी टाहो फोडला.