दीपनगरातील अभियंत्याकडे दिव्यंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र : आमदार एकनाथराव खडसेंच्या तक्रारीनंतर चौकशीत प्रकार उघड


भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील वर्ग-2 अभियंता माधव केंद्रे यांनी सादर केलेले अपंगत्व प्रमाणपत्र, तपासणी अहवाल आणि अधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बाबत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची तक्रार मुंबई येथील अलीयावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्थेकडे केली. यानंतर संस्थेने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

फौजदारी कारवाईची मागणी
आमदार खडसे यांनी संस्थेच्या संचालकांना पुन्हा पत्र पाठवून माधव केंद्र व या प्रकारात सहभागी असलेल्या संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केल्याने आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
संस्थेच्या चौकशी अहवालानुसार, माधव केंद्रे हे मंगळवार, 7 जुलै 2015 रोजी श्रवणदोष तपासणीसाठी संस्थेत आले होते. प्राथमिक चाचणीतील प्रतिसाद विश्वसनीय नसल्याने त्यांना 22 सप्टेंबर 2025 रोजी प्रगत वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आले होते मात्र ते तपासणीसाठी हजर झाले नाहीत आणि प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे त्यांच्या नावाने भुसावळ औष्णिक वीज केंद्रात सादर करण्यात आलेले पत्र, 50 टक्के श्रवणदोष दर्शवणारा कथित अहवाल आणि संस्थेच्या संचालकांच्या नावाची स्वाक्षरी संस्थेने जारी केलेली नसून ती बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या आधी दीपनगर केंद्रात काही अभियंत्यांनी ठेकेदारांना फायदा पोहोचवल्याचे प्रकरण समोर आले. आता त्यात या नवीन प्रकरणाची भर पडली आहे. दरम्यान या संदर्भातील वृत्त ‘दैनिक दिव्य मराठी’ने 17 रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले आहे.

 


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !