किनगावच्या दिशा पाटीलने भारताचे प्रतिनिधीत्व करीत बॉक्सींगमध्ये ब्रान्झ मेडल पटकावले


यावल (रविवार, 19 जुलै 2026) : यावल तालुक्यातील किनगावातील रहिवासी तथा भारतीय बॉक्सींग संघाची खेळाडू दिशा विजय पाटीलने नुकतेच ब्राइला रोमेनिया येथे पार पडलेल्या प्रतिष्ठीत गोल्डन बेल्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यात तीने उत्कृष्ट कामगिरी करीत देशासाठी ब्रान्झ मेडल जिंकले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जागतिक स्तरावर भारताचा डंका
जागतिक स्तरावर प्रतिष्ठीत मानल्या जाणार्‍या गोल्डन बेल्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धा या नुकतेच 10 ते 18 जुलै दरम्यान ब्राइला रोमेनिया येथे पार पडल्या. यात किनगाव, ता.यावल येथील रहिवासी तथा भारतिय बॉक्सींग संघाची खेळाडू दिशा विजय पाटील हिने किलो 58 वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात तिने थेट उपांत्य फेरी पर्यंत धडक दिली मात्र उपांत्य फेरीत तिला अल्जीरियाच्या बॉक्सर मेडिसा हमदाकडून पराभव पत्करावा लागला. तिला ब्रान्झ मेडल मिळवत समाधान मानावे लागले. देशासाठी तिने मिळवलेल्या ब्रान्झ मेडबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !