भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी
भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्याहस्ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्राचार्या कटलर यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचे स्मरण केले.
शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती
प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेतला. शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनातून अजित पवार यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांवर प्रकाश टाकला.




