इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे जोगलखोरी शाळेत ‘आनंदाचे ताट’ उपक्रम


भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी जिल्हा परिषद शाळेत इनरव्हील क्लब भुसावळतर्फे आनंदाचे ताट हा प्रकल्प राबवण्यात आला. जोगलखोरी गावात भिल्ल आदिवासी वस्ती असून जिल्हा परिषद शाळेत मुलांना पुरी, भाजीपाला, पुलाव, मिठाई देण्यात आली.

मंत्र्यांच्या सहकार्याने शाळा अधिक सुसज्ज
मुख्याध्यापिका अर्चना महाजन व दीपक पाटील म्हणाले की, शाळा सुरू झाली तेव्हा अनेक अडचणी होत्या पण आता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि रजनी सावकारे यांच्या मदतीने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी भाषणात सांगितले की, या शाळेतील मुलांनी चांगले काम करून उच्च पद प्राप्त करावे व शाळेचा गौरव वाढवावा.

इनरव्हीलच्या अध्यक्षा सविता शुक्ला यांनीही मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळवून समाजात प्रतिष्ठा मिळविण्याचे आवाहन केले.
जेवणाचे ताट मिळाल्याने विद्यार्थ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.

यशस्वीतेसाठी क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला, सल्लागार सदस्य रजनी सावकारे, उपाध्यक्ष पार्वती चांदवानी, आय.पी.सुनंदा भारुळे, माजी अध्यक्षा किरण शुक्ला, माजी अध्यक्षा रुचिका शर्मा आदींनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !