पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार : मंडळाधिकार्‍याची विभागीय चौकशी


भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहरातील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी 9 जुलै 2025 रोजी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

काय आहे प्रकरण ?
मंडळाधिकारी प्रवीण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करून नामंजूर नोंदी मंजूर करून घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सानप यांनी तक्रार अर्जाद्वारे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रवीण पाटील यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन बजावले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार (आस्थापना) ज्योती वसावे यांनी मंगळवार, 29 रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.

प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात हे एक महत्त्वाचे पाऊल असून दोषी अधिकार्‍यावर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असे केदारनाथ सानप यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !