उंटावद विविध कार्यकारी सोसायटीची शंभर टक्के वसुली : जिल्हा बँकेने केला सन्मान
यावल (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.उंटावद या संस्थेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव यांचेकडून आपल्या सभासदांसाठी घेतलेल्या कर्जाची 31 मार्चअखेर शंभर टक्के परतफेड केली.

यानिमित्त संस्थेचे चेअरमन शशिकांत (शशी आबा) पाटील व सचिव संजय महाजन यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील व सहाय्यक उपनिबंधक कुणाल सोनार यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यावल विभागीय कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील संस्थांचे पदाधिकारी व सचिव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
