भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृती जतन करण्याचे आवाहन
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत जागतिक आदिवासी दिन निमित्त प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
संस्कृती व परंपरा जतन करणे आवश्यक : प्राचार्य
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्याचे आवाहन केले.



आदिवासी समाज हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या माध्यमातून आदिवासी युवकांना सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या हक्कांचा सन्मान करून सामाजिक समानता व शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. ‘संस्कृतीचे जतन, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वांगीण विकास’ हा संदेश देत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जयश्री भंगाळे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.चेतन पारखे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.सविता जंगले, प्रा.रंजना ढाके, प्रा.सागर सोनावणे, प्रा.अजय साळुंखे, प्रा.राजश्री ठोंबरे, प्रकाश चौधरी, सुनील ठोसर, भाग्येश वाघुळदे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.