अपयशावर मात करणारा नेहमीच अजिंक्य : भुसावळात प्रा.जयेंद्र लेकुरवाळे

ग्रामीण मराठा समाज भुसावळ तालुक्याच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात


भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : अपयशाने खचून न जाता अपयशावर मात करायला शिकतो तो अजिंक्य होतो, असे विचार प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी कुर्‍हेपानाचे येथे व्यक्त केले. ग्रामीण मराठा समाज भुसावळ तालुका यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कुर्‍हा येथील रेणुका माता मंदिरावर क्रांतीदिनी रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 100 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व झाडाचे रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

गोंधळलेल्या मानसिकतेतून बाहेर पडा
प्रा.लेकुरवाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोंधळलेल्या मानसिकतेतून बाहेर पडा. आपल्यातील उत्तम गुण शोधून त्यानुसार ध्येय ठरवा. दहावी-बारावीनंतर आपल्या ध्येयानुसार विषय निवडावे. कोणाला काय आवडते यापेक्षा मी कशात उत्तम कार्य करू शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे. आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपले भाग्य आहे. या महाराष्ट्राने देशाला तीन स्वातंत्र्य सूर्य दिले त्यापैकी पहिला सूर्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रयतेचे स्वराज्य स्थापून पराजित भारतीय मानसिकतेला विजेता करीत राजकिय स्वातंत्र्य मिळवून दिले, दुसरे स्वातंत्र्य सूर्य महात्मा ज्योतीराव फुले ज्यांनी बंद पडलेल्या स्त्री शिक्षणाच्या वाटा उघडून देशातील महिलांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळवून दिले, तिसरे सूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सर्वसामान्य बहुजन वंचितांना संविधानाच्या माध्यामातून समतेचे स्वातंत्र्य मिळवून दिले.





मुलांनी आपल्या आई वडिलांचा आदर राखत त्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यास करावा. ज्याच्याकडे ध्येय असते त्याच्या हातात पुस्तक असते जो ध्येयहीन असतो त्याच्या हातात दगड असतो. आता आपणच ठरवावे आपल्याला काय हवे आहे ते, असेही डॉ.लेकुरवाळे यांनी सांगितले.

नगरसेविका डॉ.छाया देशमुख यांचा सत्कार
याप्रसंगी नगरसेविका डॉ.छाया देशमुख-फालक यांचा विषय सत्कार ग्रामीण मराठा समिती भुसावळ तालुका यांच्यातर्फे करण्यात आला. नगरसेविका छाया देशमुख यांनी नगरपरिषद भुसावळ येथे पाठपुरावा करून बाजारपेठ शेजारील नियोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा ठराव मंजूर करून आणला त्याबद्दल डॉ.छाया देशमुख यासह सभागृहातील ठरावाला अनुमती देणार्‍या सर्व नगरसेवकांचा सुद्धा शब्दसुमनांनी आभार या कार्यक्रमात मानण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र नाना पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी टाकळीकर, नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे यांनी आपले विचार मांडले.

माजी नगरसेविका वैशाली मराठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, तुकाराम बाविस्कर, भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, रुपेश देशमुख, ईश्वर पवार, किरण पाटील, नाना पाटील, साहेबराव पाटील, महेंद्र पाटील, विजय कलापुरे, योगेश जाधव, अ‍ॅड.रवींद्र पाटील, सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी गावातील महिला बचत गट, आरोग्य सेविका, आशा सेविका यांचा सुद्धा उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

450 रोप कडुनिंब, सीताफळ, कडुबदामाची रोप गुणवंत विद्यार्थी मान्यवर आणि गावातील नागरिकांना वाटप करण्यात आली.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारणीचे अध्यक्ष श्रीकांत बरकले, किशोर रोनखेडे, पंकज पाटील, प्रमोद पाटील, एकनाथ धांडे, बबलू भगत, अतुल पाटील, योगेश पाटील, रमाकांत रोनखेडे, संदीप पाटील, अमोल पाटील,तुषार हडप,अनिकेत चव्हाण, प्रशांत काकडे, चंद्रकांत पाटील, उमेश पाटील यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.तुषार पाटील तर आभार माजी शिक्षण मंडळ सभापती ललित मराठे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !