किनगावातील अंगणवाडी इमारतींची चौकशीची हवी : पंचायत समितीला निवेदन
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीत बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतींच्या बांधकामाचा दर्जा, निधी, लाभार्थी संख्या, प्रशासकीय मान्यता व प्रत्यक्ष वापराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन येथील पंचायत समितीत देण्यात आले.
चौकशीची मागणी
किनगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीत अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. यात गावातील अंगणवाडी इमारतीया गावाच्या बाहेर व वस्तीच्या बाहेर बांधण्यात आल्या व त्या आजवर वापरविना पडून आहे. यात शासनाच्या निधीचा अपयव्य झाला असून या अंगणवाडी बांधकाम मंजुरीपासुन संपूर्ण कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी यावल पंचायत समितीत निवेदनाव्दारे करण्यात आली. दोषींवर कारवाई करीत इमारती तत्काळ वापरात आणाव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवेदन मोहन पाटील, अफजल तडवी यांच्या वतीने देण्यात आले.


