धीरज परदेशीच्या मारेकर्‍यांना फाशी द्यावी : भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना आक्रमक

भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन : हत्येची सखोल चौकशीची मागणी


भुसावळ (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026)  : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्यावर काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरून भुसावळातील करनी सेना आक्रमक झाली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देवून करण्यात आली.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
धीरज राजपूत यांच्या हत्येतील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, हत्येमागील नेमके कारण व आरोपींचा हेतू याबाबत सखोल व निष्पक्ष तपास करावा तसेच प्रकरणात सरकार पक्षातर्फे उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी, प्रकरणाचा जलद तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तसेच दोष सिद्ध झाल्यास आरोपींना मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा मिळावी यासाठी सक्षमपणे न्यायालयीन प्रक्रिया राबवावी, मृताच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सुरक्षा व शासकीय मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींवर कारवाई न झाल्यास हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच न्याय मिळेपर्यंत लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप राणा, जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष सारीका पाटील, जिल्हा सरचिटणीस चंदू चव्हाण, पंकज चौधरी, जिल्हा सचिव कविता राजपूत, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, जयश्री पाटील, नितीन पाटील, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष श्रद्धा पाटील, तालुका सचिव प्रियंका पाटील आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !