मंगला एक्स्प्रेसमध्ये 35 विद्यार्थ्यांना विषबाधा : भुसावळ रेल्वे स्थानकावर उपचार
भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : मंगला एक्स्प्रेसने केरळकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या समुहातील 35 वर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 29 रोजी समोर आला. इटारसी रेल्वे स्थानक सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक मळमळ
उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच खंडवा
स्थानकावर वैद्यकीय पथक पाठवून विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले तसेच खंडवा ते भुसावळ दरम्यानही धावत्या गाडीत
विद्यार्थ्यांवर उपचार झाले व रात्री मंगला एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे
स्थानकावर पोहोचताच पुन्हा विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
केरळमधील साधारण आठ ते 18 वयोगटातील सुमारे 83 वर विद्यार्थ्यांचा हा समूह मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. 25 ते 30 विद्यार्थ्यांनी ईटारसी स्थानक येण्यापूर्वी जेवण केले मात्र काही वेळेत ईटारसी स्थानक येताच त्यांना सुमारे 35 विद्यार्थ्यांना उलटी व मळमळचा त्रास जाणवू लागला. रेल्वे प्रशासनाला माहिती कळवताच यंत्रणा अलर्ट झाली. खंडवा येथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर गाडीतच वैद्यकीय पथकाने पुन्हा उपचार केले तर भुसावळ रेल्वे स्थानक आल्यानंतर पुन्हा वैद्यकीय पथकाने तपासणी करीत उपचार केले. सुमारे तासभर गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री थांबून होती.

वेळीच वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या जेवणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
