आमदार एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथळीत उद्या शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती


मुक्ताईनगर (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी 75व्या वर्षांत पदार्पणानिमित्त श्री क्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात ’अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा
ज्ञानयज्ञ सोहळा’ सुरू आहे. आमदार खडसे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त राज्यभरातून विविध मान्यवरांचे दौरे प्राप्त झाले
आहेत. रविवार, 30 ऑगस्ट रोजी कोथळीत होणार्‍या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्यातील व केंद्रातील मंत्री व खासदार आवर्जून उपस्थिती देणार आहेत.

या नेत्यांची राहणार उपस्थिती
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 29 रोजी सकाळी आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती देतील तर रविवार, 30 रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजप राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, आयुष मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस आदींची उपस्थित राहणार आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !