भुसावळातील स्वामी विहार कॉलनीत घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज लंपास


भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : रक्षाबंधनानिमित्त घरमालक मुंबईला गेल्याची संधी आयतीच चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करून सोने-चांदीचे दागिने व रोकडसह एक लाख 28 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील जळगाव रोड परिसरातील स्वामी विहार परिसरात घडली.

बंद घर चोरट्यांच्या पथ्यावर
जळगाव रोडवरील हिरो शोरूममागे स्वामी विहार, दत्त मंदिराजवळ धनराज नामदेव नाथ (59, भुसावळ) हे कुटूंबासह वास्तव्याला आहेत.रक्षाबंधनानिमित्त नाथ हे मुंबईला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या वरच्या मजल्यावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे व इतर साहित्य अस्ताव्यस्त करीत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड मिळून एक लाख 28 हजार 800 रुपये


सीसीटीव्हीत चोरटा कैद
घरफोडीची माहिती मिळताच शहर निरीक्षक महेश गायकवाड व सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. यावेळी सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनराज नाथ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक पवन नायमने करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !