भुसावळ शहर पोलिसांची मोठी कारवाई : दोन जिवंत काडतूस व कट्ट्यासह संशयीत जाळ्यात
भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्या तरुणाविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश संतोष लोहार (21, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) या संशयीताकडून देशी बनावटीचा कट्टा, मॅगझीन आणि दोन जिवंत राउंड जप्त करण्यात आले. या कारवाईने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहर निरीक्षक महेश गायकवाड यांना एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी टेक्नीकल हायस्कूलजवळील एका पंक्चर दुकानाजवळील संशयीत गणेश संतोष लोहार (21, महात्मा फुले नगर, भुसावळ) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता एक देशी बनावटीचा कट्टा, एक मॅगझीन आणि दोन जिवंत राउंड मिळून आल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले.


