इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे शिक्षकांचा सन्मान
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञान, संस्कार व योग्य दिशा देणार्या शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे शिक्षकांचा सन्मान सुशीलाबाई नामदेव फलक विद्यालयात करण्यात आला.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या समर्पित कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याला आणखी प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षा योगीता वायकोळे, सचिव कविता पाचपांडे, सुनीता पाचपांडे, मोना भंगाळे, शर्वरी फालक, कविता हिरोडकर यांची उपस्थिती होती.


