भुसावळ उपविभागात 56 गुन्हेगार तडीपार तर एका टोळीविरोधातही कारवाई : पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांची माहिती

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर : उपद्रवींच्या हालचालींवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष


गणेश वाघ
भुसावळ (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : आगामी सण-उत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ पोलीस विभागाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कंबर कसली आहे. यंदाच्या वर्षात 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 758 उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 56 गुन्हेगारांवर तसेच एका टोळीला तडीपार करण्यात आल्याची
माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली. आगामी काळातही उपद्रवींविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

दोन गुन्हेगार स्थानबद्ध
पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार यंदाच्या वर्षात सराईत व उपद्रवी गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी एमपीडीए अंतर्गत दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून आगामी काळातही अशाच पद्धत्तीने कठोर पावले उचलण्यात येणार आहेत.

26 गुन्हेगार तडीपार
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत 56 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत एका टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 व 124 अंतर्गत संशयित हालचाली करणार्‍या तसेच संशयास्पद मुद्देमाल बाळगणार्‍या 14 व्यक्तींसह एक कारवाई अनुक्रमे करण्यात आली.

सराईत गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई
सण-उत्सवांच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात सीआरपीसी 110 अंतर्गत 54 केसेस दाखल करण्यात आल्या तसेच कलम 107 अंतर्गत शांतता राखण्यासाठी बंधपत्राच्या 626 केसेस दाखल करण्यात आल्या व कलम 109 अंतर्गत् 14 संशयीत व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

अवैध दारू व्यवसायावरही कारवाई
इतर प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अंतर्गत अवैध दारू व्यवसायाशी संबंधित 20 इसमांवर चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्राची कारवाई करण्यात आली.

शांतता भंग करणार्‍यांना पोलिसांचा इशारा
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा हातात घेणार्‍यांसह शांतता भंग करणे अथवा सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अशा समाजकंटकांवर भुसावळ पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा भुसावळ उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !