भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय आंतर विभागीय बुद्धीबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन
भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा (मुले व मुली) या स्पर्धेचे आयोजन दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवार, 9 रोजी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजू फालक तर उद्घाटक विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा.डॉ.गोविंद मारतळे, प्रा.डॉ.उमेश पाटील (सचिव जळगांव विभाग क्रीडा समिती), प्रा.डॉ.लिंबाजी प्रताळे (शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य), प्रा.डॉ.आनंद उपाध्याय (शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य), निवड समिती सदस्य प्रा.डॉ.प्रियंका सुलाखे, प्रा.डॉ.प्रा.प्रमोद पटेल (शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळ सदस्य), प्रा.डॉ.संजय चौधरी आयोजन सचिव व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांनी मार्गदर्शनात सांगितले की, खेळाडूंसाठी विद्यापीठामार्फत विविध योजना राबविल्या जातात त्याचा विद्यार्थी खेळाडू यांनी फायदा घ्यावा.
डॉ.दिनेश पाटील यांनी मार्गदर्शनात सांगितले की, खेळाडूंनी आंतर विभागीय बुद्धीबळ स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे व विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवून आंतर विद्यापीठस्तर स्पर्धेत मेडल मिळवून आपल्या महाविद्यालयाचे व विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा.
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून तो बौद्धिक क्षमता, एकाग्रता, तर्कशक्ती, निर्णयक्षमता, संयम, नियोजन आणि समस्या सोडविण्याची कौशल्ये विकसीत करणारा खेळ आहे. प्रत्येक चाल ही विचारपूर्वक करण्याची आवश्यकता असल्याने बुद्धिबळ खेळाडूंमध्ये दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि प्रसंगानुरूप योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करतो.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय चेस ऑर्बिटर म्हणून प्रवीण ठाकरे, राष्ट्रीय खेळाडू प्रा.आकाश धनगर, प्रा.विकास महाजन. यांनी ऑफिसियल म्हणून कार्य पाहिले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील तर प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय चौधरी तसेच आभार प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी मानले. प्रा.सुभाष वानखेडे (जळगाव), प्रा.डॉ.व्ही.के.पाटील (चोपडा), प्रा.डॉ.दीपक पाटील (धरणगाव), प्रा.डॉ.नवनीत आसी (जामनेर), प्रा.जे.बी.सिसोदिया (बांभोरी), प्रा.डॉ.तेजस शर्मा (शिरपूर) उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.दीपक जैस्वाल, प्रा.सागर सोनवणे, प्रा.अजय साळुंखे, प्रा.कबीर गवळी, प्रा.चेतन पारखे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.सविता जंगले, प्रा.रंजना ढाके, प्रकाश चौधरी, दीपक महाजन, प्रकाश सावळे, विजय पाटील, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर, भाग्येश वाघुळदे, शिक्षकेतर कर्मचार्यांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

