भुसावळात ‘आदियोगी शिव’ व 12 ज्योतिर्लिंगांची भव्य आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी


भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : सुहर्ष फाउंडेशन संचलित दुर्वांकुर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त भव्य आणि आकर्षक धार्मिक आरास साकारण्यात आली आहे. 2015 मध्ये स्थापना झालेल्या या मंडळाकडून यंदा ‘आदियोगी शिव’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. त्यात 12 ज्योतिर्लिंगांची भव्य-दिव्य आरास भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

भक्तीसह संस्कृती व परंपरेचा जागर
गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, संस्कृती आणि परंपरेचा जागर करण्याचा मंडळाचा प्रयत्न असून, भगवान शिवांच्या आदियोगी स्वरूपासह देशातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता यावे, या उद्देशाने ही विशेष आरास उभारण्यात आली आहे. दुर्वांकुर सार्वजनिक उत्सव मंडळाने स्थापनेपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यविषयक उपक्रमांबरोबरच गणेशोत्सवात नावीन्यपूर्ण संकल्पना साकारण्याची परंपरा जपली आहे. यंदाची ‘आदियोगी शिव’ आणि 12 ज्योतिर्लिंगांची आरास भुसावळकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

‘हर हर महादेव’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा मंडळाचा संकल्प असल्यची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित राजेंद्र बर्‍हाटे यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !