जावळे येथे परदेशी-राजपुत समाजाच्या मंगल कार्यालयाच्या बांधकामास स्वामीजी नारद महाराजांची सदिच्छा भेट


चाळीसगाव (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत लोकसहभागातुन समाजाचे मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. या मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी जावळे येथे समाजाचे ज्येष्ठ भगवान लोदवाळ, गोरख लोदवाळ यांच्या कुटुंबाने 56 आर.जमीन विनामूल्य दिली आहे. याच जागेवरील सुरू असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामास सत्तेजगड मिर्झापुर वाराणसी परमहंस आश्रम (आडगनंद आश्रम ) चे स्वामीजी नारद महाराज यांनी रविवार, 20 रोजी सदिच्छा भेट देऊन समाजाच्या शुभ कार्याबद्दल आशिर्वाद दिला.

मंडळातर्फे स्वामींचा सत्कार
स्वामी नारद महाराजांच्या पदस्पर्शाने मंगल कार्यालयाची भूमी पवित्र झाल्याने मंगल कार्यालयाच्या शुभकामास आशिर्वादामुळे बळ मिळाले आहे. यावेळी स्वामीजी नारद महाराज यांचे पूजन करुन त्यांचा शाल व पुष्पहार देऊन उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ, कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग परदेशी, भगवान लोदवाळ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

जळगाव लोकसभेचे माजी खासदार नानासाहेब ए.टी.पाटील यांचा सत्कार कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग परदेशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देऊन करण्यात आला. त्यानंतर भगवंताचे नामस्मरण करीत घोषणा देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
स्वामी नारद महाराज वडगाव येथील आश्रमात भंडारा कार्यक्रमाला जात असतांना त्यांनी जावळे येथील मंगल कार्यालयाच्या कामास भेट देऊन आशिर्वाद दिले आहेत. यावेळी उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल, कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग परदेशी, संचालक सुभाष महाजन, डॉ.जयसिंग परदेशी, भगवान परदेशी, अशोक परदेशी, सचिव निलेश राजपुत तसेच भगवान लोदवाळ, समाजाचे कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा, जयराम महाजन नागद, हिरालाल महाजन, संपत परदेशी, गोरख लोदवाळ, नंदलाल छानवाळ हरसवाडी, लक्ष्मण छानवाळ, अनिल परदेशी, पांडुरंग सोनार, कंत्राटदार दिलीप कुमावत, चंदन महाजन यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !