धुळ्यातील आझादनगर पोलिसांची कारवाई : बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे 75 हजारांचे स्पिरीट जप्त

दोघांना अटक : वाहनासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त


धुळे (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पिरीट रसायनाची वाहतूक करणार्‍या दोघांना आझादनगर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण एक हजार 250 लिटर स्पिरीट रसायन तसेच चारचाकी वाहन मिळून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहरातील पांझरा नदीलगत असलेल्या वड भिलाटी रोड परिसरातील एका पत्री शेडमध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरीटची वाहतूक केली जात असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एक हजार 75 लिटर स्पिरीट असलेले पाच ड्रम तसेच 175 लिटर स्पिरीट असलेले पाच ड्रम मिळून एकूण एक हजार 250 लिटर स्पिरीट (75 हजार रुपये) किंमतीचे जप्त करण्यात आले. याशिवाय स्पिरीट वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप (एम.एच.04 जी.एफ.7312) व सुझूकी वर्सा (एम.एच.01 एम.ए.6416) व पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी विनोद बन्सीलाल फुलपगारे (47, भोई गल्ली, जुने धुळे) व जितेंद्र सेवाराम टेकवाणी (47, कुमारनगर, साक्री रोड, धुळे) यांना अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर निरीक्षक विनोद पाटील, अंमलदार तुषार जाधव, विनोद सरदार, गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, मनोज बागुल, अनिल शिंपी, मकसूद पठाण, पंकज जोंधळे आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !