यावल तालुक्यातील विद्युत तारा चोरी करणारी 11 जणांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात


यावल (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव व मालोद या गावाच्या शेतशिवारामध्ये शेतकर्‍यांना विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावतांना काही चोरटे मिळून आले. मंगळवारी रात्री चोरटे किनगावच्या एका भंगार व्यावसायीकास तार देत असतांना शेतकर्‍यांनी रंगेहात पकडले.

घटनास्थळी यावल पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर रात्रीच पोलिसांनी चौघांना तिथून ताब्यात घेत मुद्देमाल आणि वाहन जप्त केले. रात्री पोलिसांनी सर्च मोहीम राबवत पुन्हा सात केबल चोरी करणार्‍यांना ताब्यात घेतले. एकूण 11 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. विद्युत वितरण कंपनीचे तार आणि केबल चोरीचे मोठे रॅकेटच पोलिसांना मिळून आल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे यावल निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी सांगितले.

संतप्त शेतकर्‍यांनी चोरट्यांना पकडले
किनगाव गावापासून मालोद जाणार्‍या रस्त्यावर शेत शिवारात विद्युत वितरण कंपनीचे तारांचे तुकडे करून त्यांचे गठ्ठे बांधून चोरी करून नेताना ग्रामस्थांना काही संशयीत दिसले व चोरीचे तार एका चारचाकी वाहनातून तार घेण्यासाठी आलेला किनगावातील भंगार व्यावसायीकही दिसताच शेतकर्‍यांनी संशयीताना पकडून ठेवत यावल पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकाने संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विद्युत तारा जप्त करण्यात आल्या. एकूण 11 संशयीत ताब्यात असून यावल तालुक्यात चोर्‍यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !