शेती नुकसानीच्या पंचनाम्याबाबत पिंपरीत आज विशेष सभा


पिंपरी, ता. शिरपूर (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : गावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या अनुषंगाने पिंपरी येथे बुधवार, ३० सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ही सभा होणार आहे.

शासनाकडून दुष्काळ तसेच शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची माहिती या सभेत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पंचनामा प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, माहिती आणि पुढील कार्यवाहीबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शेतीचे नुकसान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या गंभीर बाब आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने होऊन प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या नुकसानीची योग्य नोंद होणे गरजेचे आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय राहिल्यास मदतीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सभेला उपस्थित राहून आवश्यक माहिती व सहकार्य करावे,” असे आवाहन पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले आहे.

शेतीच्या नुकसानीची योग्य नोंद होऊन शासकीय मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी शेतकऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून सभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी तुषार शेळके यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !