कोळन्हावी येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या


यावल (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावातील 36 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले. निलेश प्रल्हाद इंगळे (36) असे मृताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कोळन्हावीतील निलेश प्रल्हाद इंगळे (36) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !