गिरडगावजवळ अपघात : देवगावच्या प्रौढाचा मृत्यू
यावल (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील गिरडगाव या गावाजवळ दुचाकी घसरून अपघात झाल्याने त्यात देवगावातील 42 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
देवगावच्या प्रौढाचा मृत्यू
गिरडगाव गावाजवळ दुचाकीद्वारे प्रवीण नवल ढिवरे (42, रा.देवगाव, ता.चोपडा) हा इसम दुचाकीव्दारे यावलकडे येत असताना दुचाकी घसरून अपघात झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. प्रौढाला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


