स्व.हरीभाऊ जावळे यांच्या शैक्षणिक कार्याला विद्यार्थ्यांच्या लेखणीतून अभिवादन

भालोद महाविद्यालयात निबंध स्पर्धा ; 25 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


भालोद, ता.यावल (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : स्व.खासदार हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण 28 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

विविध विषयांवर निबंध स्पर्धा
स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा : स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांचे शैक्षणिक योगदान, भालोदच्या शैक्षणिक परिवर्तनाचे शिल्पकार : स्वर्गीय हरीभाऊ जावळ आदी विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयाची निवड करून त्यावर निबंध लेखन केले. स्व.हरीभाऊ जावळे यांच्या शैक्षणिक कार्याचा हा वारसा विद्यार्थ्यांच्या लेखणीतून पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

28 विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 28 विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच प्रथम क्रमांकासाठी 501, द्वितीय क्रमांकासाठी 251, तृतीय क्रमांकासाठी 151 आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन करून पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस राज्यशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांच्या शैक्षणिक कार्याचा एक दस्तऐवज म्हणून जतन होणार आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्व.हरीभाऊ जावळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न आजही महाविद्यालयाच्या माध्यमातून साकार होत आहे. विद्यार्थ्यांच्या लेखणीतून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशी भावना यावेळी संस्थाध्यक्ष गणेश नेहेते यांनी व्यक्त केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !