भुसावळातील पर्यावरणप्रेमी नाना पाटील यांचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान’
भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : शहरातील पर्यावरण प्रेमी, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, निसर्गोपचार तज्ज्ञ नाना पाटील यांना रविवार, 4 ऑक्टोबर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशनमार्फत अप्रतिष्ठेचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान 2026’ ने मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते भातृमंडळ हॉल, बुलढाणा येथे गौरवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या सन्मानाला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ व आमदार संजय गायकवाड, बुलडाणा नगरपालिका नगराध्यक्षा पूजा गायकवाड, डॉ.सचिन सुपे, डॉ.त्रिदीप गुहा, प्रा.डॉ.प्रशांत कपले, एमजीएम विद्यापीठाचे योगा विभागप्रमुख गंगाप्रसाद खरात, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हा.चेअरमन नितीन पाटील, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बाबूराव कानडे, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुरस्कारानंतर नाना पाटील सर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


