यावल पालिकेच्या सभेत 55 विषयांना मंजुरी


यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : यावल नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विविध 55 विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा विषय आल्यावर भाजपा महायुतीच्या विरोधी गटाकडून पुतळ्याच्या जागेबदल संदर्भात विषय मांडण्यात आला मात्र तुम्ही पुतळ्याला विरोध करताय, असे सत्ताधार्‍यांकडून सभागृहात सांगताना शब्द आणि शब्दाचा दुराग्रह झाला आणि त्याच्यामुळे सभागृहात वातावरण तापले तर विषयाचा विपर्यास करू नका, असे सांगत विरोधकांनी सत्ताधार्‍यांचा थेट बापच काढला आणि काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र वेळीच सत्ताधारी गटाकडून व विरोधी गटाकडून स्पष्टीकरण केल्यानंतर सभागृह परत शांत झाले आणि नरम गरम वातावरणात ही सभा पार पडली. सभागृहातूनच सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच सुनावले आणि ती पोस्ट डिलीट करायला लावली आणी सर्व विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.

यावल पालिकेची सभा
यावल नगरपरिषदेमध्ये सोमवारी नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा अकरा वाजता सुरू झाली होती. या सभेच्या पटलावर विविध 55 विषय ठेवण्यात आले होते. सभेत प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब यांची उपस्थिती होती. दरम्यान विषय क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीची सिटी सर्वे क्रमांक 3038/2 ची जागा निश्चित करण्याबाबतचा विषय चर्चेला आला आणि यावेळी भाजपा महायुतीच्या वतीने राकेश कोलते, हेमराज फेगडे, योगेश चौधरी यांनी विषय मांडायला सुरुवात केली व त्यांनी सांगितले की सदरची जागा ही चारी बाजूने दर्शनी नसून ती जागा एकाच बाजूने दिसते म्हणून आपण मुख्य चौकात भुसावळ टी पॉइंटवर शेतकी संघाच्या जागेत पुतळा बांधावा व जागेत बदल त्यांनी सुचवला दरम्यान यावेळी सत्ताधारी गटातील उबाठाचे गटनेता सागर चौधरी यांनी विषय मांडताना तुम्ही विरोध करत आहात, असे सांगितले आणि त्यांनी सोशल नेटवर्कवर एक पोस्टदेखील तशी व्हायरल केली त्यामुळे महायुतीचे सर्वच पदाधिकारी संतापले. यात नगरसेवक उमेश फेगडे यांनी थेट सत्ताधार्‍यांचा बाप काढत, तुमच्या बापचा राज चालू आहे का, तुम्ही काही कराल का? अशा पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे सभागृह चांगले तापले होते मात्र या संपूर्ण वादात नगरसेवक अतुल पाटील,पराग सराफ यांनी मध्यस्थी करीत सभागृहात आपण एकमेकाचा गैरसमज करत आणि सनदशीर भाषेचा वापर करावा, असे सांगितल्यानंतर हा विषय तिथे थंड झाला आणि नंतर नगराध्यक्ष यांनी सुचवलेली जी जागा होती तेथेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर इतर सर्व 55 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !