भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात


भुसावळ (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये भारताचे लोहपुरुष, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

प्रतिमेचे मान्यवरांनी केले पूजन
शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सेवाज्येष्ठ शिक्षिका शालिनी बनसोडे यांच्याहस्ते स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ.प्रदीप साखरे, एस.टी.चौधरी, मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सामूहिक शपथ
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राष्ट्रीय एकात्मता व देशाची एकता आणि अखंडता जपण्याची सामूहिक शपथ घेतली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

सूत्रसंचालन एन.एच.राठोड यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !