भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : धरणगावातील दुचाकी चोरीचा गुन्हा उघड
भुसावळ (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेत एक लाख रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. आरोपीसह दुचाकीचा ताबा धरणगाव पोलिसांना देण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीला गेल्याने गुन्हा दाखल होता. चोरट्याने हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 इ.जे.4091) लांबवल्यानंतर या चोरीबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अल्पवयीनाला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेली एक लाख रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त केली. शनिवार, 31 रोजी चोरीची मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक शत्रुघ्न पाटील, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, भूषण चौधरी, चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी, जीवन कापडे, अक्षय कोतकर, जावेद शहा, मोहसीन शेख, अशोक बाविस्कर, सचिन चौधरी, अमर आढाळे आदींनी ही कारवाई केली.


