भुसावळ शहरात ‘23 महिला हिरकणींचा सन्मान’


भुसावळ (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : आस बहुउद्देशीय विकास संस्था भुसावळ व सप्तरंग एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भुसावळसह तापी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणार्‍या 23 महिला भगिनींना हिरकणी सन्मान देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बियाणी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका संगीता बियाणी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नंदग्राम गोधामचे संचालक अभिलाष नांगला, गोल्डन अवर हॉस्पिटलचे डॉ.शांतनु कुमार साहू, डॉ.सुवर्णा गाडेकर, अर्चना माळी, आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे महेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कार्थी यांना हिरकणी सन्मान देण्यात आला.

सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम मयूर मोरे व आरती मोरे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पंकज कासार व त्यांच्या टीमने केले.

यांचा हिरकणी सन्मान पुरस्काराने गौरव
अनिता पाटील (संगीत), प्राचार्या नीना कटलर (शिक्षण), मीनाक्षी घेटे (पोलिस दल), प्रीती पाटील (राजकीय/सामाजिक), प्रा.वंदना ठोके (शिक्षण), रत्ना पाटील (ब्युटी व सौंदर्यशास्त्र), स्नेहा लढ्ढा (शिक्षण व कला), पारुल वर्मा (झुंबा/योगा), अ‍ॅड.वृषाली शिरनामे (विधी), अ‍ॅड.कल्पना टेमाणी (विधी), गायत्री कुमावत (ब्युटी व सौंदर्यशास्त्र), तन्वी सूर्यवंशी (ब्युटी व सौंदर्य शास्त्र), सुषमा भिडे (उद्योजिका), प्रियंका जाधव (नृत्य), सरोज मंत्री (शिक्षण), डॉ.गौरी खानापूरकर (वैद्यकीय), डॉ.वृषाली चौधरी (वैद्यकीय), नूतन फालक (सामाजिक), सविता माळी (सामाजिक), आरती मोरे (संगीत), डॉली टाक (शिक्षण)

यावेळी आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या डॉ.वंदना वाघचौरे व महिला पतंजली योग समिती भुसावळच्या महानंदा पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !