किनगाव दगडफेक प्रकरण : 16 संशयीत न्यायालयीन कोठडीत
यावल (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या पथसंचलनास एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यात विरोधावरून पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 16 जणांची पोलीस कोठडी शनिवारी संपली. दरम्यान संशयीताना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयीतांची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली.
काय घडले किनगावात ?
किनगाव, ता.यावल येथे चुंचाळे रोडावर एका धार्मिक स्थळासमोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास विरोध दर्शवतांना रस्त्या अडवण्यात आला होता. समुदायास बळाचा वापर करून रस्त्यावरून हटवतांना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस उपनिरीक्षकासह सात जण जखमी झाले. या गुन्ह्यात 16 संशयीतांना अटक करण्यात आली व या सर्व 16 जणांना शनिवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी या गुन्ह्यात पुन्हा एकास अटक करण्यात आली. त्यासदेखील शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असलेल्या या सर्व 17 संशयीत आरोपींना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयीतांची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहे.

असे आहे संशयीत आरोपी
हारुण नसीर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफान खान शेर खान, आजीम शेख कलीम, अल्ताफ कडू पिंजारी, कलीम शकील पिंजारी, आसीफ मुस्ताक खाटीक, समीर खान शकील खान, वसीम खान अयूब खान,रियाज राजु तडवी, समीर खान युनुस खान,शेख जावीद शेख कलीम, इम्रान फारुख बागवान, रहीम शहा रमजान शहा फकीर व भिकारी उर्फ बबलु निसार खाटीक या 16 जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले.


