फैजपूर शहरात घरफोडी : अज्ञात चोरट्याने एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल लांबवला
यावल (रविवार, 1 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील फैजपूर शहरात आशिष सराफ नगरात अज्ञात चोरट्याने बंद घराच्या कडी कोंड्याला तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तिथून लांबवले. एकूण एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले फैजपूरात ?
फैजपूर शहरात आशिष सराफ नगर असून तेथे धनराज मनोहर बडगुजर (राहणार भालोद) यांची बहीण राहते. धनराज बडगुजर यांनी त्यांच्या बहिणीच्या घरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. बहिणींच्या बंद घरात घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराचा दरवाज्याच्या कडी-कोंड्याला तोडून घरात प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तेथून लांबवले. एक लाख 90 हजार रुपयांचे दागिने तेथून चोरी झाले.

याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात धनराज बडगुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे.


